Ads Area

(PAN-Aadhaar Link) तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर ते लवकर पूर्ण करा.

        मुंबई : तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN-Aadhaar Link) केले नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. तुम्ही ३१ मार्च २०२३ नंतर असे न केल्यास तुमचे पॅन निष्क्रीय होईल. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली आहे. यावेळी आयकर विभाग ती वाढवण्यास अनुकूल नाही. याच कारणास्तव आयकर विभाग सतत पॅनकार्ड धारकांना त्यांचे पॅन त्यांच्या आधारशी लिंक करण्यास सांगत आहे.विलंब शुल्ककेंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ३० जून २०२२ पासून पॅन कार्ड (PAN Card) ला आधार कार्ड (Aadhar Card) शी लिंक करण्यासाठी १००० रुपये विलंब शुल्क आकारत आहे. प्राप्तिकर विभागाने सांगितले की, प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार, आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. या मुदतीत पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल.
(PAN-Aadhaar Link)

  • १० हजार रुपयांपर्यंत दंड
पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास अशा लोकांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खाती उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय हे पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास मोठा दंड होऊ शकतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२बी अंतर्गत तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
ठेवी ठेवता आणि काढता येणार नाहीत.
  1. - पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास कर विवरणपत्र भरले जाणार नाही.
  2. - कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात अडचणी येतील.
  3. - म्युच्युअल फंड किंवा आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही.
  4. - सरकारी योजनांचा लाभ घेतानाही अडचणी येतील.
  • आधार-पॅन लिंकिंग प्रक्रिया
  • - प्रथम १००० रुपये भरावे लागतील
  • - सर्वप्रथम आयकर वेबसाइटवर जा.
  • - येथे क्विक लिंकमधील आधार लिंकवर क्लिक करा.
  • - पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
  • - पेमेंटसाठी NSDL वेबसाइटला भेट देण्याची लिंक दिसेल.
  • - CHALLAN NO./ITNS २८० मध्ये, Proceed वर क्लिक करा.
  • - टॅक्स अॅप्लीकेबल (००२१) Income Tax (Other than Companies) निवडा.
  • - टाइप ऑफ पेमेंटमध्ये (५००) Other Receipts ला निवडावे लागेल.
  • - पेमेंट मोड, नेट बँकिंग आणि डेबिट कार्ड असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
  • - तुमच्या सोयीनुसार तुम्ही दोनपैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
  • - परमनंट अकाउंट नंबरमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर टाका.

  • - मूल्यांकन वर्ष २०२३-२०२४ निवडा.
  • - पत्तामध्ये तुमचा कोणताही पत्ता टाका
  • - आता कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा.
  • - Proceed वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमची भरलेली माहिती स्क्रीनवर दिसेल.
  • - माहिती तपासल्यानंतर I Agree वर खूण करा, Submit to Bank वर क्लिक करा.
  • - तुम्ही प्रविष्ट केलेल्या तपशिलांमध्ये काही विसंगती असल्यास, संपादन वर क्लिक करा.
  • - आता नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड पर्याय निवडून Others मध्ये 1000 रुपये भरा.
  • - व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ मिळेल. हे डाउनलोड तुमच्याकडे ठेवा.
  • - हे पेमेंट अपडेट होण्यासाठी ४-५ दिवस लागतील.
  • पेमेंट भरल्यानंतरची प्रक्रिया
  • - ४ ते ५ दिवसांनंतर तुम्हाला आधारच्या आधारे प्राप्तिकर वेबसाइटवरील लिंकवर पुन्हा क्लिक करावे लागेल.
  • - पॅन नंबर आणि आधार क्रमांक टाका आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
  • - तुमचे पेमेंट अपडेट केले गेले असेल तर स्क्रीनवर continue चा पर्याय दिसेल.

  • - Continue वर क्लिक करा आणि आधार कार्डानुसार नाव आणि मोबाईल नंबर टाका.
  • - I Agree वर टिक करून पुढे जा. आता तुम्हाला एक OTP मिळेल.
  • - OTP टाका आणि validate वर क्लिक करा. आता एक पॉप अप विंडो उघडेल.
  • - तुमची आधार पॅन लिंकिंगची विनंती प्रमाणीकरणासाठी UIDAI कडे पाठवण्यात आली आहे, असे पॉप अपमध्ये लिहिले जाईल.
  • - सत्यापनानंतर, तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल. तुम्ही आयकर वेबसाइटवर त्याची स्थिती तपासू शकता.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area